FDA Maharashtra recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, मासिक वेतन किती ? अर्ज कोठे करायचा ? अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती ? अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक पदवी ? अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क ? आणि नेमकी कोणत्या पदांची भरती होणार ?
जाणून घ्या…
1970 मध्ये औषध नियंत्रण संचालनाचे नाव बदलून अन्न व औषध प्रशासन असे करण्यात आले. भेसळयुक्त अन्न तसेच तंबाखू उत्पादनांचा समावेश करण्यासाठी FDA व्याप्ती वाढवण्यात आली. 1971 मध्ये शहर पातळीवर विविध मंडळ कार्यालये उघडण्यात आली. 1975 मध्ये त्याचा विस्तार झाला आणि विभागीय स्तरावर परवाने देण्यासाठी आयुक्त तसेच संयुक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली.
FDA Maharashtra recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर विभागांतर्गत प्रयोगशाळांमध्ये या पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी केवळ ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. राज्यस्तरीय निवड समितीच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आणि food and drug administration Maharashtra recruitment 2024 ची जाहिरात खाली दिलेली आहे
सदर जाहिरातीमध्ये भरती प्रक्रिया ही एकूण 56 पदांसाठी होणार असून त्यामध्ये रसायनशास्त्रज्ञांसाठी 37 आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकांसाठी 19 पदांची भरती केली जाणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, ईडब्लूएस आणि इतर वर्गांसाठी आरक्षण दिले गेले आहे.
FDA Maharashtra recruitment 2024 भरती तपशील :-
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) 2024 मध्ये 56 पदांसाठी सदर भरतीची जाहिरात केलेली आहे.
पदांमध्ये विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ (एस-१४ ग्रेड) आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (एस-१४ ग्रेड) यांचा समावेश करण्यात आला आहे.
FDA Maharashtra recruitment 2024 उपलब्ध पदे :-
अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra द्वारे “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
FDA Maharashtra recruitment 2024 पदाचे नाव :-
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
- विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ.
FDA Maharashtra recruitment 2024 रिक्त पदांची संख्या :-
56 पदे.
FDA Maharashtra recruitment 2024 वयोमर्यादा :-
किमान १८
कमाल ३७ वर्षे (आरक्षित वर्गांसाठी शिथिलता)
FDA Maharashtra recruitment 2024 मासिक वेतन :-
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट ब) = S-14: 38,600 – 1,22, 800 अधिक
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट क) = S-13: 35,400 – 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
FDA Maharashtra recruitment 2024 शैक्षणिक पात्रता –
विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञासाठी: फार्मसी पदवी किंवा रसायनशास्त्र/जैव-रसायन शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, किंवा विज्ञान पदवी आणि औषध विश्लेषणात १८ महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक.
तसेच
-वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकासाठी: द्वितीय श्रेणी विज्ञान पदवी किंवा फार्मसी पदवी असणे आवश्यक.
FDA Maharashtra recruitment 2024 अर्ज शुल्क :-
– अराखीव (खुला) प्रवर्ग : रु १०००/-
– राखीव प्रवर्ग :९००/-
FDA Maharashtra recruitment 2024 महत्त्वाच्या तारखा :-
सविस्तर अधिसूचना 18 जानेवारी 2024 पासून
http://www.fda.maharashtra.gov.in या लिंक वर उपलब्ध.
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 सप्टेंबर 2024
- शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2024.
FDA Maharashtra recruitment 2024 विशेष सवलती :-
– मागासवर्गीय, खेळाडू ,आर्थिक दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिल असेल,
त्यामुळे या उमेदवारांसाठी उच्चतम वय ४३ वर्षे असेल.
– दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल असेल.
– पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल.
– भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.
FDA Maharashtra recruitment 2024 शिथिलतेची मर्यादा :-
– मागासवर्गीय दिव्यांग आणि खेळाडू यांना वयोमर्यादेत मिळणारी सवलत यापैकी कोणत्याही एका कारणासाठीच देय असेल. म्हणजेच जास्तीत जास्त एका प्रकारची शिथिलता लागू केली जाईल.
FDA Maharashtra Bharti 2024 अंतर्गत विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ (गट-ब) आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट-क)या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल.
FDA Maharashtra Bharti 2024 आणि Food and Drug Administration Maharashtra Recruitment 2024 या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची हीच ती उत्तम संधी आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेल्या PDF चे पूर्णपणे वाचन करावे व मगच फॉर्म भरावा.
– सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
– सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी, चुकीची माहिती आढळल्यास अर्ज मंजूर केला जाणार नाही.
– ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकल्याची खात्री करून घ्यावी.
– उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आपल्याजवळ ठेवावी.
– उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही.
-प्रस्तुत जाहिराती परीक्षा संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक आहार होता आरक्षण वयोमर्यादा परीक्षेत चे स्वरूप परीक्षा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील वेळोवेळी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील कृपया त्याचे अवलोकन करावे.
FDA Maharashtra recruitment 2024अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– http://www.fda.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावरील “सर्वसाधारण सूचना” या सदर मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना इत्यादी माहिती वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार असून याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही असे पदभरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
– स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे,अंशतः बदल करणे,पदांचे एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग,महाराष्ट्र शासन,मंत्रालय, मुंबई यांना तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहते व या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कोणासही कोणताही दावा करता येणार नाही.
सविस्तर माहितीसाठी खालील PDF वाचावी:-