SSC GD Exam 2024-2025 : एसएससी जीडी’ ची मेगाभरती जाहिरात जारी…!!!
एकूण 39871 रिक्त पदांसाठी होणार भरती अर्जाची थेट लिंक !!!
SSC GD Exam 2024-2025 ची स्टाफ सिलेक्शन कमिशनने SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध
केली आहे. SSC मार्फत सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल (AR),
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सचिवालय सुरक्षा दल (SSF),
इंडो तिबेटियन सीमा पोलीस (ITBP), आणि NCB मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांची भरती योजना आयोजित केली जाते.
SSC GD Exam 2024-2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. या मेगा भरतीतून बीएसएफ (बीएसएफ), सीआयएसएफ (CISF), एस एस बी (SSB), एआर (AR), सी आर पी एफ (सीआरपीएफ), एसएसएफ (SSF), आयटीबीपी (ITBP), आणि एमसीबी (NCB) मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार असून, सदर जाहिरातीमधून 39 हजार 481 पदे भरली जाणार आहेत, यामध्ये सर्वाधिक पदे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बीएसएफ (BSF)मार्फत भरली जाणार आहेत. बीएसएफ(BSF) च्या एकूण 13 हजार 306 जागांसाठी भरती होणार आहे. तदनंतर सर्वाधिक सीआरपीएफ(SRPF) ची 11 हजार 299 पदांसाठी देखील भरती होणार आहे. तसेच आयएसएफ(CISF) 6 हजार 430 पदे भरली जाणार आहेत. तर आयटीबीपी (ITBP) ची 2 हजार 564 पदे भरली जाणार आहेत.
या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे एसएससी जीडी (SSC GD) कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज 5 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरले जाणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 रात्री 11 वाजेपर्यंत भरता येणार आहे. तसेच ऑनलाइन की भरण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. तर फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 5 सप्टेंबर 2024 पासून 7 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे.
अंदाजे ही परीक्षा 2025 या वर्षांमध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
SSC GD Exam 2024-2025 परीक्षेसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :-
- परीक्षा पद्धती :
ही परीक्षा मल्टिपल चॉइस (objective)प्रश्नांसह असेल.
– शारीरिक तपासणी मध्ये उंची, छाती, वचन यांचे मापदंड तपासले जाईल.
– शारीरिक कार्यक्षमता चाचणीमध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी अशा कार्यक्षमता तपासणीच्या चाचण्या घेतल्या जातील.
– वैद्यकीय तपासणी मध्ये आरोग्य चाचणी केली जाईल.
– सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. - शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा :
किमान 18 वर्षे
कमाल 23 वर्षे
कर्मचारी निवड आयोग SSC GD (एसएससी जीडी) कॉन्स्टेबल
2024- 25 परीक्षा भरती नियमानुसार वयात अतिरिक्त सूट. - 4. वेतन श्रेणी : रु. 21,700 ते रु. 69,100
- अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या बाबी :
अर्जामध्ये विचारलेल्या सर्व बाबी नमूद कराव्या.
तुमचा फोटो आणि सही अचूक अपलोड करावी.
(फोटोचा आकार 20 KB ते 50 KB पर्यंत असावा, तसेच सहीचा आकारही 10 KB ते 20 KB पर्यंत असावा.) - अर्ज करण्यासाठी शुल्क :
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी: रु.100 /- शुल्क भरावे लागेल.
महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) यांना शुल्कातून सूट आहे.
ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इ.)
- अधिकृत वेबसाईट :
https://ssc.gov.in/login
SSC GD Exam 2024-2025 भरती प्रक्रियेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल :-
- संगणक आधारित परीक्षा (CBE)
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- वैद्यकीय तपासणी (DME/RME)
- कागदपत्रांची तपासणी
SSC GD Exam 2024-2025 महत्त्वाच्या तारखा : –
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख – 5 सप्टेंबर 2024 ते 10 ऑक्टोबर 2024
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख –10 ऑक्टोबर 2024
- परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2024
- परीक्षा अर्ज दुरुस्तीसाठीची तारीख – 5 सप्टेंबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024
- परीक्षेची तारीख (अंदाजीत) – जानेवारी/फेब्रुवारी 2025
- प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल
SSC GD Exam 2024-2025 अर्ज भरताना घ्यावयाची काळजी/ महत्त्वाच्या सूचना :-
- सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- पात्रतेचे निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा समजून घेण्यासाठी दिलेल्या माहितीचा आधार घ्या.
- दिलेल्या तारखांचे व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
- अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यक बाबी अचूक नमूद करा.
- तुमचा फोटो सही आणि इतर अत्यावश्यक गोष्टी व्यवस्थित अपलोड करा.
इतर महत्त्वाच्या जाहिराती
FDA Maharashtra recruitment 2024
अशाच अजून नवनवीन जॉब अपडेट्स त्वरित मिळवण्यासाठी आपल्या telegram आणि YouTube channel ला join करा.
telegram channel – https://t.me/jobmaaza
YouTube channel-https://youtu.be/hk7qkI2oqzQ?si=OILsvZBi-vw1U2pt
Notification PDF – Notice_of_CTGD_2024_09_05