MAHARASHTRA SET 2024 (राज्य पात्रता परीक्षा 2024)

MAHARASHTRA SET 2024 (राज्य पात्रता परीक्षा 2024)

महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा म्हणजे राज्य पात्रता परीक्षा 2024 ही परीक्षा महाराष्ट्र सेट या नावाने देखील ओळखली जाते व वर्षातून एकदा ही परीक्षा घेतली जाते.यंदाच्या वर्षी देखील ही परीक्षा आयोजित केलेली आहे यावर्षी होणारी परीक्षा ही 39 वी सेट परीक्षा असणार आहे.
यावर्षीच्या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीची सेट परीक्षा होणार आहे ती ऑफलाइन पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असेल.

सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या परिपत्रकानुसार  2024 नंतर होणाऱ्या सेट परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा पास होण्याची सर्व विद्यार्थ्यांची ही शेवटची संधी असेल.

MAHARASHTRA SET 2024 (राज्य पात्रता परीक्षा 2024)

MAHARASHTRA SET 2024 (राज्य पात्रता परीक्षा 2024) अर्ज करण्याची वेळ व दिनांक

MAHARASHTRA SET 2024 (राज्य पात्रता परीक्षा 2024) परीक्षा फी बाबत महत्त्वाच्या सूचना

  • खुला प्रवर्ग – 800 /-
  • इतर मागासवर्गीय किंवा भटक्या व विमुक्त जाती जमाती किंवा विशेष मागासवर्गीय ( प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी)किंवा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PwD) किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा तृतीयपंथी किंवा अनाथ – 650 /-
  • विलंब शुल्क – 500 रुपये असेल
  • विद्यार्थ्यांनी छापील अर्जाची प्रिंट स्वतःकडे जपून ठेवावी.
  •  उमेदवारांसाठी फी भरण्याची पद्धत – क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग.
  • विशेष टीप – विद्यार्थ्यांनी पेमेंट केल्याची पावती स्वतःकडे जपून ठेवावी.
  •  महत्त्वाची सूचना – जे विद्यार्थी या अगोदरच राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र सेट परीक्षा पास झालेले असतील त्या विद्यार्थ्यांना परत परीक्षेचा फॉर्म भरून परीक्षेला बसता येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण  https://setexam.unipune.ac.in/  या वेबसाईटला जाऊन भेट द्यावी फॉर्म भरल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरलेली असेल त्यांची नावाची यादी फेब्रुवारी 2024 मध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल जर यादीमध्ये परीक्षा फी भरून देखील नाव नसेल तर परीक्षार्थी विद्यार्थ्याने set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल द्वारे फी भरल्याचा पुरावा पाठवावा म्हणजेच फी भरलेली  पावती पाठवावी.

MAHARASHTRA SET 2024 (राज्य पात्रता परीक्षा 2024) परीक्षा केंद्रे

पुणे, सोलापूर ,अहमदनगर ,मुंबई धुळे ,नाशिक ,जळगाव ,छत्रपती संभाजी नगर ,नांदेड ,अमरावती, नागपूर,चंद्रपूर रत्नागिरी, परभणी ,गडचिरोली व पणजी.

 

 

Leave a comment