NIACL recruitment 2024

NIACL recruitment 2024

NIACL recruitment 2024
NIACL recruitment 2024

NIACL recruitment 2024 न्यू इंडिया  कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांवर मोठी भरती ऑनलाईन पद्धतीने करता येणार अर्ज!!! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!!!325 रिक्त जागा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू…!!!सरकारी नोकरी मिळावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु प्रत्येकाचे स्वप्न सत्यात उतरेल अशी परिस्थिती नसते त्याचवेळी अशा संधी उपलब्ध होतात की त्यातून सरकारी नोकरीचे स्वप्न सत्यात उतरते. नोकरीच्या अशा संधी उमेदवारांना त्यांच्या भवितव्यात स्थिर व सुरक्षित जीवनशैली चालविण्यासाठी मार्ग दाखवतात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत अप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध झाली असून या संधी पात्रता निकषांवर आधारित आहेत

NIACL recruitment 2024 :-

न्यू इंडिया अश्शुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) NIACL recruitment 2024 ने अप्रेंटिस पदासाठी (शिकाऊ)एकूण 325 रिक्त जागांसाठी भरती आदेश काढलेले आहेत संपूर्ण तपशिलांसह तपशीलवार NIACL अधिसूचना 2024 ची संपूर्ण माहिती असणारी PDF संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे.
NIACL शिकाऊ भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईट https://www.newindia.co.in/ या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत या संकेतस्थळावरती भरून जमा करावेत.
न्यू इंडिया अश्शुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने आर्थिक वर्ष 2024-2025 साठी एकूण 325 अप्रेंटिस (शिकाऊ) रिक्त पदांची घोषणा केलेली आहे . तसेच उमेदवारांची निवड 1 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीसाठी केली जाईल. शिकाऊ पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दिला जाणार स्टायपेंड रुपये 9000 प्रति महिना इतका आकारण्यात येईल.

राज्यभरात अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, हवेली, दिव दमन, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लेह, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिसा, पौंडेचेरी,पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बंगाल अशा अनेक ठिकाणी अप्रेंटिस या पदासाठी अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,एसटी ,ओबीसी, ई डब्ल्यू एस, अशा जातीनिहाय उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात भरती पदांची संख्या उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या पदवीपात्रतेनुसार 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करावेत.

NIACL recruitment 2024 अर्ज कसा करावा :-

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
  3. लिंक ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेल्या प्रत्येक घटकाचे उत्तर तेथे ऑनलाइन पद्धतीने नमूद करणे आवश्यक आहे
  4. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  5.  सर्व माहिती वाचून लागणारी आवश्यक माहिती अर्ज भरताना नमूद करणे गरजेचे आहे
  6. अर्ज भरून झाल्यानंतर सर्व माहिती बरोबर आहे ना याची शहानिशा करून पहावी.
  7. सर्व माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे.
  8.  अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे गरजेचे आहे.
  9. अर्ज 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील.
  10. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 आहे.
  11. 5 ऑक्टोबर 2024 नंतर अर्ज भरण्याची मुदत संपेल त्यानंतर हे संकेतस्थळ निष्क्रिय होईल तदनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

NIACL recruitment 2024 अर्ज करताना लागणाऱ्या आवश्यक बाबी:-

1 – आधार कार्ड /पॅन कार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन/पासपोर्ट

2 – व्हॅलिड स्वतःचा ईमेल आयडी

3 – मोबाईल नंबर

4 – पासपोर्ट साईज फोटो
(फोटो हा JPEG, size – less than 1 MB )

5 – 10 वी चे मार्कलिस्ट,12 वी चे ,मार्कलिस्ट डिग्रीचे वर्षनिहाय सर्टिफिकेट, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. (जन्मतारखेच्या तपासणीसाठी)
(सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात (1MB)

अर्जाची पद्धत :- ऑनलाइन

पदाचे नाव :- अप्रेंटिस (शिकाऊ)

एकूण पदसंख्या :- 325 जागा

प्रशिक्षण कालावधी :- 1 वर्ष

शैक्षणिक पात्रता :-

1. उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी किंवा कोणतीही समक्ष पदवी धारण केलेली असावी.

2. उमेदवारांना अर्ज केलेल्या राज्य /केंद्रशासित प्रदेशातील प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा :- किमान 21 वर्षे
कमाल 30 वर्षे

वेतन श्रेणी : 9000 /- दरमहा

NIACL recruitment 2024 अर्ज करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :-

  • सामान्य/ओबीसी : रु.800 + GST@ 18% = रु.944
  • सर्व महिला उमेदवार : रु.600 + GST@ 18% = रु.708
  • SC/ST : रु.600 + GST@ 18% = रु.708
  • PWD : रु.400 + GST@ 18% = रु. 472

(मूळ जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचावी

अधिकृत वेबसाईट :
https://www.newindia.co.in/

 

NIACL recruitment 2024 निवड प्रक्रिया :-

  • ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा घेण्यात येईल
  • त्यानंतर राज्यनिहाय कॅटेगिरी नुसार मेरीट लिस्ट उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविली जाईल
  • प्रतीक्षा यादी सुद्धा बनविली जाईल
  • उमेदवारांची वैद्यकीय फिटनेस तपासणी करून मगच नेमणूक दिली जाईल
  • अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची असेसमेंट टेस्ट घेतली जाईल
  • अचूक रित्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना मेलद्वारे ट्रेनिंग साठी निवडलेल्या जिल्ह्याची माहिती विचारली जाईल आणि अर्जाचे शुल्क भरण्याबाबत सूचित केले जाईल.

इतर महत्त्वाच्या जाहिराती

FDA Maharashtra recruitment 2024

Leave a comment