PET Exam 2024
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेण्यात येणारी पीएचडी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या PET Exam 2024 चे नोटिफिकेशन दिनांक 9/7/2024 रोजी विद्यापीठाकडून प्रसारित करण्यात आलेले आहे ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांची एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाईल व त्यानंतर पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल आणि त्या दोन्हीच्या गुणांवरती विद्यार्थ्यांचे सिलेक्शन केले जाईल.
पीएचडी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे सिलेक्शन हे एंट्रन्स एक्झामिनेशन वरती 70% तर इंटरव्यू वरती 30% अशा वेटेज नुसार करण्यात येणार आहे.
PET Exam 2024 स्टेज – I & II
प्रथम एंट्रन्स एक्झामिनेशन होईल ती 100 गुणांची असेल आणि त्याच्यामध्ये पास होणारे विद्यार्थीच इंटरव्यू राऊंड साठी पात्र असतील म्हणजेच जे एंट्रन्स एक्झाम मध्ये पास होणार नाहीत ते इंटरव्यू राऊंड साठी पात्र नसतील.एंट्रन्स एक्झामिनेशन चा पेपर हा दोन पार्ट्स मध्ये घेतला जाईल त्यातील पहिला पार्ट हा Research Methodology चा असेल त्याच्यावरती 25 प्रश्न विचारले जातील ते 25 प्रश्न प्रत्येकी दोन मार्गाचे असतील तर दुसऱ्या पार्ट मध्ये विद्यार्थ्याचा जो विषय असेल त्या विषयातील 25 प्रश्न ते देखील प्रत्येकी दोन मार्काचे विचारले जातील. परीक्षा ही Multiple Choice Type Questions स्वरूपात असणार आहे तर परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे Negative Marking स्कीम वापरली जाणार नाही पार्ट 1आणि पार्ट 2 असे मिळून 100 मार्काचा इंट्रान्स एक्झामिनेशन पेपर चे स्वरूप असणार आहे.
PET Exam 2024 परीक्षेचे वेळापत्रक –
- अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक –10 जुलै 2024
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख –10 ऑगस्ट 2024
- पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन ची दिनांक – 24 ऑगस्ट 2024
- पीएचडी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एंट्रन्स एक्झाम च्या निकालाची संभाव्य दिनांक – 5 सप्टेंबर 2024
- परीक्षा पास झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट विद्यापीठाकडून देण्यात येणार नाही.
- पीएचडीसाठीची एंट्रन्स एक्झामिनेशन ही ऑनलाइन मोडमध्ये होणार आहे व त्यासाठी परीक्षेची केंद्रे ही अहमदनगर,नाशिक व पुणे ही असणार आहेत.
- परीक्षेचा कालावधी हा 1 तास 30 मिनिटांचा असेल.
- परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी 50% तर रिझर्व कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी 45% गुण मिळवणे आवश्यक असेल.
PET Exam 2024 प्रवेशासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता –
- विद्यार्थ्याने Bachelors degree with Research/Honors पूर्ण केलेला असावा व एक वर्षाची Masters degree पूर्ण केलेली असावी किंवा तीन वर्षात वर्षाचा Bachelors degree व दोन वर्षाची Masters degree पूर्ण केलेली असावी त्यामध्ये त्याला कमीत कमी 55% मार्क मिळालेले असावे OR qualifications declared equivalent to master degree by corresponding statutory regulatory body.
PET Exam 2024 विशेष सवलत –
- जे विद्यार्थी खाली दिलेल्या परीक्षांपैकी कोणतीही एक परीक्षा पास झाले असतील त्यांना इंत्रन्स इन्ट्रान्स परीक्षेसाठी सवलत देण्यात आलेली आहे ते विद्यार्थी एंट्रन्स एक्झाम न देता इंटरव्यू साठी पात्र असतील.
- UGC-NET/NET-LS/UGC-CSIR NET/SET/GATE (VALID SCORE)/JRF/SRF/ICAR/ICMR/DET/DST/CEED आणि तस्सम राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा.
PET Exam 2024 परीक्षा फी व महत्त्वाच्या सूचना –
- पीएचडी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी जनरल कॅटेगरीसाठी फी – 1500/- तर रिझर्वेशन कॅटेगरीसाठी फी 1000/- एवढी असेल.
- ज्या विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी सवलत मिळालेलीआहे अशा विद्यार्थ्यांसाठी जनरल कॅटेगरीसाठी फी – 1000/- तर रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 800/- रुपये एवढी फी असेल.
- प्रवेश अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा असल्याकारणाने फी देखील ऑनलाइन माध्यमातून भरावयाची आहे त्यासाठी विद्यार्थी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकतात.
- प्रवेश अर्ज हा युनिव्हर्सिटीची वेबसाईट http://www.unipune.ac.in वर खाली दिलेल्या लिंक मध्ये मिळेल
- https://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx
- विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी आपल्या विषयानुसार रिक्त असलेल्या जागा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती तपासून पहाव्यात.
- विद्यार्थ्याने ऑनलाइन फॉर्म भरताना खालील कागदपत्रे अपलोड करावीत – मास्टर्स डिग्री चे मार्कलिस्ट स्कॅन कॉपी,कास्ट सर्टिफिकेट रिझर्व कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांसाठी स्कॅन केलेली कॉपी(if applicable),नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली कॉपी रिझर्व कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांसाठी(if applicable),दिव्यांग असल्यास मेडिकल सर्टिफिकेट,अनाथ उमेदवार असल्यास डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून चे सर्टिफिकेट ची स्कॅन केलेली कॉपी.
- पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.
- परीक्षेचा निकाल हा फक्त पात्र किंवा अपात्र अशा स्वरूपात लागेल कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांना गुण सांगितले जाणार नाहीत.
- विद्यार्थ्याला एका वेळेस एकाच स्पेशलायझेशन साठी पीएचडीला ऍडमिशन दिले जाईल विद्यार्थी जास्तीत जास्त तीन स्पेसिलायझेशन्स मध्ये परीक्षेसाठी अर्ज करू शकतात परंतु त्यासाठी त्यांना वेगवेगळी फी भरावी लागेल जर विद्यार्थी एकापेक्षा जास्त विषयांमध्ये पेट एक्झाम पास झाला तर कोणत्याही एका विषयाला त्याला ऍडमिशन दिले जाईल.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट http://www.unipune.ac.in वरती भेट देऊ शकतात.
Notification PDF – PET Notification_09072024.pdf.crdownload
- Telegram channel – https://t.me/jobmaaza
- Instagram account – https://www.instagram.com/jobmaaza18?igsh=MTFpMmxsOWNqdG82bQ==
- YouTube channel – http://www.youtube.com/@Jobmaaza